Wednesday, 19 August 2015

तू नसताना

तू असताना कळले नव्हते मनीचे हे मज गुज
तू नसताना आता उरली मनिची ही कुजबूज

तू असताना मनात माझ्या आनंदाचा पूर
तू नसताना मनात माझ्या फ़क्त असे काहूर

तू असताना भासे मजला मी अस्मानी परी
तू नसताना खोटे सगळेे गोष्ट असे ही खरी

तू असताना दिवस रात्र होती माझ्या साजऱ्या
तू नसताना त्याच आता वाटती मला बोचऱ्या

एकदाच ये फिरुनी सखाया तळमळतो हा जीव
स्पर्शाने तुज फुलुनी येईल होईल तोच  सजीव

No comments:

Post a Comment