त्या नयनाचे या नयनाला गुपित कसे हे उलगडले
अबोल त्या बोलांनी मी रे आज कशी ही विरघळले
जगतच होते मी हे जीवन जिवंत नव्हते जाणाविले
प्राण माझिया होऊनी तू मज पुन्हा जगाया शिकविले
नयनांना या कळले ना, त्या नजरेचा अर्थ कधी
नयनांना या कळले ना, त्या नजरेचा अर्थ कधी
धूसर होते सगळे म्हणुनी, कळली ना भाषा ती कधी
पुसता ते दव मज दिसले रे, स्वच्छ श्वेतसे आकाश
मग रंगांनी भरुनी मी पण ,चित्र असे ते रंगविले
नयन नसे हे असे आरसा ,भावभावनांचा जैसा
शब्द बोलती काही वेगळे, नजर घेतसे कानोसा
कुणी न फसवु शकले यांना फसवुनी ते गेले मजला
नकळत माझ्या गूज मनीचे त्यांनी तुज बघ सांगितले
No comments:
Post a Comment